बोरीचे नाई
मी माझ्या मेहूनीच्या लग्नाच्या स्थळी पोचण्यासाठी प्रवास करत होतो . रात्री 10 चा वेळ झाला एक तास झाले गाडी काही आली नाही म्हणून बाहेर बसस्टँड समोरील जागेत आलो . एक एक गाडीवाले आपल्या हिशोबाने भाव सांगत होते किंवा नाही जात म्हणून सांगत होते. एक वयस्क सद्गृहस्थ तिथे बसले होते . बराच वेळ माझ्या बोलण्याकडे पाहून मला बोलले "कुठ जायचं आहे " , 'मंठा रोडला मंगल कार्यालय आहे तिथं." मी आपले नेहेमी प्रमाणे प्रामाणिकपणाने सर्व खरे सांगितले . " बस शेवटची 11:30 ला आहे तोपर्यंत थांबणार का?" " नाही"आपल्या सोयीनुसार मी खुणावले . अजून एक मुलगा तिथे उभा होता तो कुठ चाललाय आम्ही विचारले तो ही आमच्याच दिशेने जाणार एवढे कळले की आम्ही पुढे पायी निघलो आणि एक लोडींग गाडी थांबवली . ड्रायव्हरला विचारले तो नाहीच म्हणत होता पण त्याला कुठे चालला हे जेव्हा नीट चौकशी केली तर तोही जरा बाजूने पण आम्ही ज्या दिशेने चाललो त्याच दिशेने जाणार होता . विषय तरी जरा फिरत होता कारण बोरीच्या साहेबांना जिथे जायचे तिथे तो न जाता अलिकडूनच वळणार होता . ते जेव्हा विचारत होता की रात्र आहे पुढे चल...