Posts

Showing posts from September, 2024

डॉ. ननावरे , PHD Marathi, LLM, PHD scolar in law.

प्रसंग: प्रवास स्वारगेट ते आळंदी. डेक्कन कॉलेज पर्यंत जागा नाही भेटली पण थोडी बस रिकामी झाली आणि एक जागा मला उतरणाऱ्या प्रवाशाने दिली. मी बाजूच्या व्यक्तीला बघत नेहमीचा प्रश्न विचारला कुठे उतरणार ? जेणेकरून ते आधी उतरतील तर आपण window seat घेऊ हा उद्देश . त्यांनी सांगितले देहू फाटा . मग मी निवांत झालो की मला जिथे उतरतो तिथेच हेही उतरणार आहेत म्हणजे window seat nahi पण परत जागा सोडायची गरज नाही. मग पुढे थोड्या वेळाने त्यांनी मला विचारले कुठे उतरणार आणि देहू फाटा यायला किती वेळ लागेल तसेच आळंदी मध्ये आधी उतरून मग परत देहू ला यावे का देहू फाट्यावरून पुढे जावे मी नेमके काम विचारल्यावर कळले की डॉ. साहेब पेट परीक्षा द्यायला आळंदीच्या कॉलेजला चालले आहेत आणि त्यांनी मराठी मध्ये already PhD Keli आणि आता ते LLM करून law ची pHD करू इच्छित होते आणि त्यांनी त्यांची जीवन कथा ग्रॅज्युएशन ते आता आणि त्याचे प्रवास हे सर्व या एका तासाच्या कालावधीत पूर्ण केले मनात चालू असलेल्या अनेक प्रश्नांची त्यांनी निरसन करण्याचा प्रयत्न केले शेवटी आम्ही दोघे देहू फाट्याला उतरलो आणि पुढे निघालो वाटेत चहा प्यायला. मग ड...