नवल जी मिरीकर
प्रसंग 1 - कंपनी मधील cubical प्रदीप भाऊंनी सहज असा प्रश्न विचारला की संगळे अनुत्तरित झाले प्रश्न असा होता की सिंधुताई सपकाळ यांनी रामबद्दल काही वाईट शब्द बोलले ते का बोलले असतील ? जरा विचार करून मी बोललो कारण त्या महानुभाव पंथाच्या असतील म्हणून कारण त्यांच्या साठी कृष्ण रामापेक्षा मोठा असेल म्हणून . प्रदीप भाऊ मला बोलले हुशार आहे राव तू . आता मला सांग कृष्णाने 16100 बायका का केल्या . मी बोललो नाही माहिती . ऐक जेव्हा रामाने अहिल्या शिळे मधुन परत मानव रूपात आणली तेव्हा अनेक लग्न न झालेले माणसे एक एक दगड घेऊन राम कडे निघाले आणि बोलू लागले आम्हाला पन बायको करून द्या आम्हाला पण बायको करून द्या आणि 16100 नग असे झाले की त्यांच्या बोलण्यात फरक पडला आम्हाला पण बायको करून घ्या , आम्हाला पण बायको करून घ्या , मग आपल्याला तर माहीतच आहे राम एकवचनी एक पत्नी तो म्हणाला या जन्मात तर मी नाही करू शकत पण पुढील जन्मात नक्कीच करुत आणि कृष्णाला त्या बायका कराव्या लागल्या . तसे नवल जी मिरी गावचे आहेत म्हणे ...