चव्हाण ड्राइवर
प्रवास : चाकन ते वाळूज।
सकाळी 4:30 चा टाईम होता मी वाट बघत बसण्यापेक्षा जी भेटेल ती गाडी पकडण्या साठी सापडत होतो पण काही लागतं नव्हते , थांबत नव्हते, शेवटी 5 च्या सुमारास एक ट्रक थांबली कुठ जायचं ,शिक्रापूर , बसा .
मी बसलो , मी विचारले कुठवर चालली गाडी ड्रायव्हर - वाळूज एमआयडीसी. मी बोललो चला मला ही तिकडे जायचं आहे .
पुढे आम्ही काही किलोमीटर गेलो तर आम्ही एक चहाच्या दुकानात बसलो आणि तो दिवस मनोज जरांगे यांच्या पहिल्या विराट सभेचा दिवस होता म्हणून टी बातमी त्या चहाच्या दुकानात काही जुन्या clips लोक ऐकत होते .
मग ड्राइवर साहेब बोलले मानूस खर बोलतो आणि मनातले बोलतो बघा आता जात कोणतीही असो गरीबाला न्याय मिळाला पाहिजे हे आपले मत .
आपण योग्य बोललात मीही तिकडच चाललो होतो आणि तिथून पुढे गावाकडे जाणार होतो.
पुढे अनेक प्रवासी घेत आणि सोडत आम्ही पुढे पुढे जात होतो. अनेक प्रवासी मला जेव्हा भेटत तेव्हा त्यांच्या बद्दल कुतूहल एक असायच की हे माणसे कोण कोणता मानूस हाच प्रवास बघू शकते पाहिले 2 प्रवासी जे भेटले ते tata इलेक्ट्रिक बॅटरी च्या कारखान्यात काम करत होते एक बिहार चा होता आणि एक नगर चा .
बिहार वाला जो होता तो एक वर्ष काम केल्यानंतर घरी चालला होता तर नगर वाला सुट्टी भेटली म्हणून शेत कसायला निघाला होता .
बिहार च्या त्या प्रवाशाला मी विचारले पुण्यात जाऊन तिथून काही सोय बघायची ना तर त्याने मला सांगितले आता ट्रेन नगर वरुन लवकर भेटते तर तिकडून चाललो आहे.
त्यांच्या बोलण्या वरुन हे समजले की त्यांचा एक सहकारी zamil नावाच्या कारखान्यात काम करत होता आणि तो संरक्षण उपकरणे न वापरल्यामुळे एक आपघाताचा बळी ठरला त्या मानाने त्यांचे काम फार सोपे आणि कमी हलाखीचे आहे म्हणून ते तो कारखाना सोडत नाही आणि बिहार वाला 15 दिवसांनी तर नगर वाला 2 दिवसांनी परतणार होते .
एवढ्या सगळ्या गोष्टी बोलत असताना ते केव्हा उतरले ते कळलंच नाही .
पुढे ड्रायवर साहेब आणि मी एकटे असतांना मी त्यांची चौकशी केली तर ते परिवहन महामंडळाच्या बस चे चालक म्हणून कार्यरत होते पान कोऱ्ओनानंतर काही लोक परत उशिरा पोचल्याने ज्यांना घरी जा असे सांगितले त्यात त्यांनी ही घरचा रास्ता पकडला पण त्यांचा आणि महामंडळाचा संबंध अजून संपला नव्हता अजून काही हियरिंग बाकी आहेत आणि त्या नंतर कामावर राजू होण्याचाही आदेश येऊ शकतो असे त्यांचे म्हणणे होते ,
पुढे उतरतांना जे ठरले त्याप्रमाणे मी त्यांचा मोबदला दिला आणि आपल्या पुढच्या वाटचालीस प्रारंभ केला
Comments
Post a Comment