बोरीचे नाई
मी माझ्या मेहूनीच्या लग्नाच्या स्थळी पोचण्यासाठी प्रवास करत होतो .
रात्री 10 चा वेळ झाला एक तास झाले गाडी काही आली नाही म्हणून बाहेर बसस्टँड समोरील जागेत आलो .
एक एक गाडीवाले आपल्या हिशोबाने भाव सांगत होते किंवा नाही जात म्हणून सांगत होते.
एक वयस्क सद्गृहस्थ तिथे बसले होते . बराच वेळ माझ्या बोलण्याकडे पाहून मला बोलले "कुठ जायचं आहे " ,
'मंठा रोडला मंगल कार्यालय आहे तिथं." मी आपले नेहेमी प्रमाणे प्रामाणिकपणाने सर्व खरे सांगितले .
" बस शेवटची 11:30 ला आहे तोपर्यंत थांबणार का?"
" नाही"आपल्या सोयीनुसार मी खुणावले .
अजून एक मुलगा तिथे उभा होता तो कुठ चाललाय आम्ही विचारले तो ही आमच्याच दिशेने जाणार एवढे कळले की आम्ही पुढे पायी निघलो आणि एक लोडींग गाडी थांबवली . ड्रायव्हरला विचारले तो नाहीच म्हणत होता पण त्याला कुठे चालला हे जेव्हा नीट चौकशी केली तर तोही जरा बाजूने पण आम्ही ज्या दिशेने चाललो त्याच दिशेने जाणार होता . विषय तरी जरा फिरत होता कारण बोरीच्या साहेबांना जिथे जायचे तिथे तो न जाता अलिकडूनच वळणार होता . ते जेव्हा विचारत होता की रात्र आहे पुढे चला मी पूर्ण पैसे देतो पण तो ड्रायव्हर तयार होत नव्हता .
आणि उशीर होतोय हे कळले मग आम्ही सगळे एकमत करून निघालो . माझ्याकडे जी बॅग होती ती जरा बाजूने ठेवली गेली .
मग मी बोललो राहू द्या माझ्याकडं तर ते साहेब बोलले बसायला जागा होऊ द्या माझ्यावर विश्वास ठेव मी व्यापारी माणूस आहे मी करतो व्यवस्थित . आम्ही 4 जन पुढे बसलो .
मग ड्रायव्हर चालू झाला मी तुम्हाला बसू नव्हतो देत कारण गाडीत कॅश आहे आणि बागबान साहेब गाडी GPS ने ट्रॅक करतात म्हणून माझा रस्ता बदलू नाही शकत.
आता आम्ही फार बोलू इच्छित नव्हतो पण साहजिकच आम्ही त्याला सांगितले की हे आमच्या सारख्या माणसांना तू सांगितले म्हणून ठीक आहे पण बाकी कोणाला दर वेळी सांगू नको .
तो ही होकारार्थी मान हलवत होता .
पुढे आमचं संभाषण सुरू झाले साहजिकच वयस्क माणसे जेवढे मनमोकळे बोलतात तसे ते चालू झाले . मी व्यापारी आहे व्यापार करून एक मुलगी मुलगा शिकवले आणि मुलगी पुण्याला असते . मुलगा इकडे मला मदत करतो . मी ही संभाषण वाढवण्याकरता काही प्रश्र्नवजा वाक्य मध्ये मध्ये बोलत होतो .
आणि जसा मला वयक्तिक पुण्याबद्दल आकस आहे तो मी मांडत होतो . की भरवशी माणसं तिथे नाहीतच फार दुर्मिळ आणि सहसा आपल्या भागातील असतील तर ते जाणीव ठेवतात . तसे इथे इतर लोक फार कमी आहेत जे खरच अशी मानसिकता ठेवतात . बरोबर आहे मी माणसे मोजली तर आमच्या गावातून 150 ते 200 लोक मुलीच्या लग्नाला आम्ही परिवार होतो आणि जेव्हा त्यांनी रिसेप्शन ठेवले मोजून 30-40 लोक दिसले साहेबांनी जोडले .
पण तरीही इथे लोक का थांबत नाही ते तिकडेच का पळतात .
असे मी जेव्हा विचारले तेव्हा त्यांचे उत्तर असे आले की हे निझाम स्टेट असल्यापासून आहे काही लोक रुबाबात राहत आलेत आणि बसून खायला नाही भेटत आता म्हणून लोक कामाला बाहेर जातात .
आणि शिकलेले लोक बाहेरच गेल्या मुळे अडाणी लोक सत्तेत राहिले आणि या भागाचं वाटोळं झालं असे त्यांनी पूर्ण केले .
मग मी बाजू असलेल्या तिसऱ्या मुलाला काय कसे कोण विचारले तर तो एक मुस्लिम मुलगा आणि आज महावितरण कंपनीच्या परीक्षा देऊन घरी निघाला होता असे आम्हाला कळले . मग आम्ही पुढे संवाद चालू ठेवला तर असे लोक आपल्याकडे असावेत हे नोकरीला लागले पाहिजेत . तर आमची सरकारसोबत मीटिंग झाली असे ती मुलगा म्हणाला.
पुढे सरकार म्हणजे पॉलिटिक्स आलेच म्हनून साहेब सुरू झाले की हे निझाम काळा पासून बसून खाणारे लोकच जाळपोळ, मारामारी , खून हल्ले करत असतात म्हणून लोक इथ राहायला पण घाबरतात .
आणि त्यांनी एक गोळीबाराचा ताजा विडिओ आम्हाला दाखवला.
मी ही तत्वाच्या मोठ्या गप्पा मारायच्या म्हणून बोललो . " तसा या क्षेत्रात मी पहिल्यांदा आलोय पण जुने लोक आम्हाला सांगतात की आम्ही तौर ठाकूर आहोत आणि आमचे 22 1/2 गावे आहेत या गोदावरी नदीच्या काठावर आणि दुधना काठी 12 1/2 गावे आहेत भुतेकर नावाची . आणि हे लोक जेव्हा आले तेव्हापासून आतापर्यंत मोठ्या राजकीय पदावर मी बघितले नाही कारण त्यांनी तत्वे ठेवले कोणत्याही मार्गाने मोठे होण्याचे स्वप्न आम्ही नाही बघत ." असे बोलल्यावर त्यांचा मला असे उत्तर होते .
होते मराठा, राजपूत , या लोकांनी भरपूर काळ लढाई सोडून बाकी कामात घातला आहे .
मी ही पुढे बोललो की मला जशी माझ्या वडिलांकडून माहिती मिळाली आहे "अगोदर मारवाडी आणि बंजारा लोकांचे तांडे जे होते . तर मारवाडी व्यापार करत आणि बंजारा ते रामवंशी स्वतः ला रामाचे वंशज मानत आणि ते अजून त्यांच्या पात्रातून बाहेर नाही आले म्हणून त्यांनी काही काळ लुटमार केली, तसेच भंडारी, पिंडारी, रोहिले , रझाकार यांनीही पुढे ती लुटमार कायम ठेवली . लुटमार कोणाची झाली तर येथील स्थानिकाची. म्हणून ही लोक इथे थांबत नसतील."
मी राजपुतात नाई आहे असे ते साहेब मला बोलले आणि ते पुढे म्हणाले की रोटी बेटी हा आपापल्या समाजातच होतो . जसे तुमचे आमच्या गावात चौधरी नावाने पाहुणे असतील .
इथे येईल तेव्हा येईल पण आपले काम आपण करत राहावे.
जसे प्रत्येक जन सूर्याची वाट बघत बसला तर अंधार दूर होणारच नाही . तुमच्यासारखे काही दिवे अगोदर तेवत राहावे म्हणजे सूर्याला नमस्कार करायला कमी ओझे लागेल आणि अंधार ही काही प्रमाणात दूर होइल .
तेव्हढ्यात आमची गाडी माझ्या थांब्यावर आली . जिथे सर्व सासरकडील मंडळी तिथे वाट बघत होती.
आज ही गोष्ट लिहल्यावर ती काल परवा चीच असल्यासारखी वाटते.
Comments
Post a Comment