पुलिस मित्र गव्हाने नगरवाले
नगर ते शेंदी गांव या प्रवासात हे प्रस्थ अम्हाला प्रवासात लाभले . चव्हाण ड्रायव्हर यांच्या गाडीत आम्ही जात असताना हे भेटले.
"ह्या शेंडी गावपर्यंत जायचयं बसू का , (होकर्थी मन हलविली ड्रायव्हर), सकाळी सकाळी गाड्या भेटत नाही राव.
माझ्या बोलण्याकडे लक्ष असताना ते बोलले की मला ह्या शहरात काहीही प्रॉब्लेम नाही. मी पोलीस मित्र आहे ना .
आणि आता सुजय साहेब आले आहेत तर वातावरण पण छान आहे .
मग आम्ही त्या राजकारणाच्या विषयावर काही गप्पा मारल्या आणि पुढे मी एक वेगळा विषय घेतला की तो तेव्हाच उद्भवलेला प्रसंग होता की त्र्यंबक महादेवाला एक मुस्लिम जाऊन त्याने ते पूजाऱ्यांना नको असलेल्या काही गोष्टी केल्या पन राज ठाकरे ह्यांच्या मते टी परंपरा फार जुनी आहे तस आख्ख्या महाराष्ट्राची समजली जाणारी भवानी माता आहे आणि तिथे पन काही परंपरा रिती रूढ आहेत तेव्हा गव्हाने महाशयांनी आपली गोष्ट सुरू केली की धनाजी तेली यांच्या घरून आजही देवीला तेल जाते . त्यांनी त्या देवीचा सांभाळ केला . लहान मुलीच्या स्वरूपात त्यांना ती देवी मिळाली आणि ती तिच्या मूळ स्वरूपात येईपर्यंत धनाजीनि तिचे देवत्व मान्य केले . या अशा अनेक गोष्टीमद्धे मग पुढे चमत्कार जोडले जातात ते खरे आहे पन काही अंशी ते आपण मान्य केले पाहिजे .
मग ड्रायवर साहेबांनी जोडले की जशे शिवाजी महाराजांना देवीने तलवार दिली तसेच सेवालाल महाराज यांनी भवानी मातेच्या मंदिराशी नाते जोडले आणि त्यांनी जे काही संदेश दिला त्यात असे सांगितले की एक रुपयाला वाटिभर पानी भेटेल आणि आज आपण बघतो पानी त्यापेक्षा महाग झाले .
एवढे बोलणे झाले की शेंडी गांव आले आणि गव्हाने साहेब त्या ट्रक मधून उतरले .
आणि आम्ही पुढील प्रवास सुरू केला
Comments
Post a Comment