Posts

Showing posts from November, 2023

विष्णू झेंडे

मुंबईच्या सीएसएमटी येथे २६/११ च्या हल्ल्याच्या दहशतीमध्ये सार्वजनिक घोषणा प्रणालीचा वापर करून लोकांना शांतपणे सुरक्षिततेसाठी मार्गदर्शन करून अगणित जीव वाचवणारे रेल्वेचे उद्घोषक विष्णू दत्ताराम झेंडे यांना विनम्र अभिवादन माझ्यामध्ये आता कोणतीही भीती उरली नाही: २६ नोव्हेंबरच्या हल्ल्यानंतर 10 वर्षांनंतर 26/11 ला शेकडो लोकांना वाचवणारा माणूस आणि सुरक्षेतील त्रुटी उघडकीस आणणारा माणूस, एचटी परत लढणाऱ्या, प्राण गमावलेल्या वीरांकडे पाहतो, मुंबई सुरक्षित करण्यासाठी उचललेली पावले २६ नोव्हेंबर २००८ च्या रात्री, दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ला गोळ्यांनी छिन्नविछिन्न केले, तेव्हा विष्णू दत्ताराम झेंडे स्टेशनमधील एका छोट्या उद्घोषकांच्या बूथमध्ये होते, सार्वजनिक घोषणा प्रणालीचा वापर करून लोकांना सुरक्षिततेसाठी मार्गदर्शन केले. "अशा परिस्थितीसाठी तुम्हाला कोणीही तयार करत नाही. ही त्वरित प्रतिक्रिया होती,” झेंडे म्हणाले. 2008 मध्ये, झेंडे हे उपनगरीय रेल्वेचे उद्घोषक होते. त्याच्या नेहमीच्या दिनक्रमानुसार तो नालासोपारा येथून निघून गेला, जिथे तो अजूनही...

नारायणभाऊ (आजोबा)

 प्रवास : कोयाळ ते रिधोरी गाव आणि परतीचा प्रवास सावरगाव पर्यंत सोबत. ही जवळपास सगळ्यात नवी भेट . आधी पूर्वकल्पना दिल्याने मी बस येण्याच्या वेळेला बस स्टॉप ला पोहोचलो . सोबत आणलेली  केळ्याची पिशवी त्यांनी माझ्या हातात दिली आणि चल असा इशारा केला. आम्ही दोघे पायी निघलो . वाटेत कोणी तरी भेटले त्याने गाडीवर आम्हाला चारीच्या रस्त्यापासून गावच्या हद्दीत पोचवले . नेहमप्रमाणेच बऱ्याच वर्षांनी आल्यासारखे झाले म्हणून ते बघत होते आणि मला चालता चालता विचारत होते की दिवाळी कशी काय, मी म्हणालो सुतक पडले , अरारा इकडे पण का , कोण गेले कधी गेले . मी आपल्या पद्धतीने त्यांना ते सर्व काही सांगितलं मग त्यांनीही सांगितलं की आमच्या गावतही सुतक पडलय मी ही त्यांनीं सांगितलेली माहिती ऐकून घेत होकारार्थी मान हलवली. घरी पोचल्यावर आम्ही दोघांनी बसल्या ठिकाणी चहा का जेवण तर जेवणाचा वेळ झालंय जेवण करू असे बोलणे झाले . मग आम्ही पुढे गाव फिरलो आणि मंदिराजवळील नवीन बाकावर बसून कोणी तिथे येतंय का अशी वाट बघितली . पुढे आम्ही दोन घरी फफिरून रानात वेढा करायला गेलो . वेढा करतांना कोणीही दिसले की आम्हाला बारे वाटत हो...

गुड्डन भय्या (मुंबई रिटर्न )

 ही गोष्ट जवळपास दिवळीच्याच काळातील , आपण दिवाळीला  गेलो की  की 3 ही पंगतीत बसण्याची आपल्याला सवय आहे म्हणून माझ्या दिवसातील काही वेळ गुड्डन भय्या (मुंबई रिटर्न )  ह्यांच्या सोबत गेला विषय हाच ज्या समोर गोष्टी दिसतात त्याच कारण विचारण्याची आपल्याला फार चांगली सवय आहे . म्हणून मी जस्ट विषय काढला की  दिवळीला आपल्याकडे सून माहेरी का जात असते काही कारण सापडते का ?  तर एक साहजिक उत्तर आले की रीत असते ती ! , मी विचारले ही रीत पडण्यामागे के कारण असतील .  तर गुड्डन भय्या पुढे बोलू लागले जर विचार केला तर जुन्या काळात सासू सुनेच नात हे ज्याप्रमाने वर्णन केले जाते त्या हिशेबाने सुनेला विश्रांतीच्या काही दिवसामध्ये दिवाळी हा सन असावा . कारण काही का असेना आई आणि मुलीत नाते जे होते ते घट्ट असते असा समज होता .  आपल्या मराठवाडा प्रांतात आणि इतर जागी दिवाळी अशी वेगळी का दिसते .एक फरक असा होता की नगर नाशिक पुणे या ठिकाणी दिवाळीला सून लक्ष्मीपूजनाला स्वतःच्या घरी असते आणि भाऊबीजेला माहेरी जाते पण आपल्याकडे अगोदरच आणि फार जास्त कालावधी असतो .त्यावर गुड्डन  भय्या...

मास्तर भाऊ

ही गोष्ट आहे 2007-08 च्या काळातील आहे . काही माणसे मला त्यांच्या जाण्याच्या समयी माझ्या घरी भेटून गेले त्यातलेच माझे चुलते मास्तर भाऊ. मी तेव्हा  8 वीत असेल आणि मी माझे गणिताचं पुस्तक वाचत होतो आणि माझ्या कडे 9 अंकी संख्या पर्यंत पुस्तकात वाचत असताना आणि तेव्हा तिथं तेही उपस्थित असल्याने त्यांनी सहज मला विचारले की ह्याच्या पुढं काय असते माहीत आहे का. मी म्हणालो नाही, त्यांनी पुढे सांगितले की रामायणात 18 महापद्म वानर होते श्रीरामासोबत .  मग कोटी , दशकोटी , अर्व, खर्व , निखर्व, पद्म,  महापद्म  येथपर्यंत गणती मांडून दाखवली आणि मी ही ते काही वेळातच आत्मसात केली .  ते सर्व पाहून त्यांनी मला ज्ञानेश्वर महाराजांचे पसायदान समजून सांगितले की कृष्ण आणि ज्ञानेश्वर यांत फरक एवढा आहे की कृष्ण अर्जुनाला लढायला सांगतो आणि ज्ञानेश्वर आचरण शुद्ध ठेवयाला सांगतात जेणेकरून पुढील व्यक्तीचे मतपरिवर्तन होण्याची शक्यता असते कारण  सत्ययुग - साम. त्रेतायुग - दंड (बळ) द्वापार - दाम कली - भेद (बुद्धिभेद) म्हणून द्वापार कालीन आणि कलियुगीन मानवी अवस्था आणि अपेक्षा ह्या खऱ्याने वेगळ्या आ...

गुळवे पाटील लातूर वाले

प्रवास : चाकण ते पिंपरी. प्रवासानंतर ज्या ठिकाणी पोचायचे तिथे सहज म्हणून जायचे निघलो तर संध्याकाळ झाली. फोन करून गेलो म्हणून घर सापडायला कमी वेळ लागला . तशी अपेक्षा नव्हती पण जवळपास 8-9 वर्षानंतर एक चेहरा डोळ्यासमोर आला जो ओळखीचा तर होता पण पाहण्यात नव्हता . बघितल्यावर नेहमी प्रमाणे नमस्कार झालं . पण त्या हर्शमय वातावरणात थोड्या वाईट बातम्या थोड्याच वेळच्या संभाषणात जगजाहीर झाल्या. साहेब आताच गावाकडून तिथे आले होते . वडिलांना बऱ्याच वेळा दवाखाना झाला असे कळले आणि थोडा वेळ मी ही संभाषण थांबवले . पुढे नेहमीप्रमाने आपल्या शैलीत साहेब बोलले "किती गोष्टी सांगितल्या त्या खऱ्या झाल्या . " आपलंही समर्थनार्थ उत्तर "जवळपास सगळ्याच ." मग उगाच कर्णाच उदाहरण दिल्यावर तिकडन उपरोधक बोलणे "कर्ण कुठ आपण कुठ आपल्या सोयीनुसार कोणाशी तुलना करने अजून संपले नाही का तुझ ."  नाही आपले उत्तर . यापेक्षा ज्या गोष्टींनी आपले अर्थर्जन होईल त्याच गोष्टी येऊ द्या बाहेर . बाकी ज्याला भेटायला गेलो तो मुलगा बाहेर नातेवाईकांना भेटायला जात होता . त्याला वाट लावून आपले संभाषण परत चालू झाले ते...