नारायणभाऊ (आजोबा)
प्रवास : कोयाळ ते रिधोरी गाव आणि परतीचा प्रवास सावरगाव पर्यंत सोबत.
ही जवळपास सगळ्यात नवी भेट . आधी पूर्वकल्पना दिल्याने मी बस येण्याच्या वेळेला बस स्टॉप ला पोहोचलो .
सोबत आणलेली केळ्याची पिशवी त्यांनी माझ्या हातात दिली आणि चल असा इशारा केला. आम्ही दोघे पायी निघलो . वाटेत कोणी तरी भेटले त्याने गाडीवर आम्हाला चारीच्या रस्त्यापासून गावच्या हद्दीत पोचवले .
नेहमप्रमाणेच बऱ्याच वर्षांनी आल्यासारखे झाले म्हणून ते बघत होते आणि मला चालता चालता विचारत होते की दिवाळी कशी काय, मी म्हणालो सुतक पडले , अरारा इकडे पण का , कोण गेले कधी गेले . मी आपल्या पद्धतीने त्यांना ते सर्व काही सांगितलं मग त्यांनीही सांगितलं की आमच्या गावतही सुतक पडलय मी ही त्यांनीं सांगितलेली माहिती ऐकून घेत होकारार्थी मान हलवली.
घरी पोचल्यावर आम्ही दोघांनी बसल्या ठिकाणी चहा का जेवण तर जेवणाचा वेळ झालंय जेवण करू असे बोलणे झाले .
मग आम्ही पुढे गाव फिरलो आणि मंदिराजवळील नवीन बाकावर बसून कोणी तिथे येतंय का अशी वाट बघितली .
पुढे आम्ही दोन घरी फफिरून रानात वेढा करायला गेलो . वेढा करतांना कोणीही दिसले की आम्हाला बारे वाटत होते कारण दिवाळी नाही पण लोक कामात रमेलेले होते .
रानात पानी चालू होते आणि तूर आणि कापूस दोन्ही पिके आपला जम बसवून आमच्या समोर बसली होती . सर्व बाजूंनी पानी, तूर आणि कापूस बघून झाल्यावर आम्हाला कळले की आता ऊन वाढत आहे म्हणून आम्ही घरी निघालो.
घरी पोचलो आणि थोडा वेळ बसलो की आम्हाला जायची वेळ जवळपास झाली असे समजले की आम्ही कामाला लागलो . प्रथम मला जस कळले की मला गावातून काही माझ्यासोबत घेऊन जायचे ते मी मागितले आणि ते मला मिळाले . जाता जाता त्यांनी आपल्या मुलीला ( म्हणजे माझ्या आईला ) भाऊबीजेच्या दिवशी साडीसाठी पैसे देऊन ते निघाले .
या वयातही (जवळपास 80 च्या आसपास ची ती व्यक्ति ) माझ्यासोबत माझ्या गतीने चालत होती ( माझ्या पाठीवर माझे दफ्तर होते ती गोष्ट वेगळी ) आम्हाला जातानाही एक व्यक्ति तिथे मिळला जो बसस्टॉप च्या वाटेने चालला होता . आम्ही त्याच्यासोबत बसस्टॉप ला पोचलो . जवळपास 90 मिनिटे आम्ही तिथे काढले आणि बस आली आम्ही बस मध्ये बसलो आणि बस निघाली वाटेत तशा औपचरीकच गप्पा झाल्या आणि तिथे 90 मिनिटातही आम्हाला बरेच गावकरी भेटले .
माझा स्टॉप अगोदर असल्याने मी उतरलो. पुढे फोन वर पोचले की नाही ही मी खात्री करून घेतले .
हा तोच मनुष्य ज्याच्यासोबत मी अनेक ठिकाणी महादेवाचा अभिषेक केला ( रिधोरी, शिंगणापुर, परळी वैजनाथ इत्यादि ) ज्याला गावात देवबाप्पा म्हणून ओळख आहे जो व्यक्ति शिदोबाचा गुलाल लावून त्याची ख्याती मिरावणारा आहे ( जसे त्या कांतरा पिक्चर मध्ये हीरो करतो तसे ) . काही वैयक्तिक गोष्टींनी जरी मन खचले तरी ते कुठच समोर न दाखवणारा हा व्यक्ति जर आपल्याला भविष्यात व्हावे लागले तर त्याने माझ्या मनात साठवलेल्या कोणत्या रिती वापरायच्या ही साहजिकच माझ्या आवाक्याबाहेर असल्यासारखे मला वाटते .
नातीच्या लग्नात नाचणाऱ्या म्हातारीपेक्षाही हा माणूस नशीबवान असेल कारण त्याने खरंच या जगात स्वत:च्या वारशाच्या काही गोष्टी पेरल्या आहेत .
Comments
Post a Comment