गुड्डन भय्या (मुंबई रिटर्न )
ही गोष्ट जवळपास दिवळीच्याच काळातील , आपण दिवाळीला गेलो की की 3 ही पंगतीत बसण्याची आपल्याला सवय आहे म्हणून माझ्या दिवसातील काही वेळ गुड्डन भय्या (मुंबई रिटर्न ) ह्यांच्या सोबत गेला विषय हाच ज्या समोर गोष्टी दिसतात त्याच कारण विचारण्याची आपल्याला फार चांगली सवय आहे . म्हणून मी जस्ट विषय काढला की दिवळीला आपल्याकडे सून माहेरी का जात असते काही कारण सापडते का ?
तर एक साहजिक उत्तर आले की रीत असते ती ! , मी विचारले ही रीत पडण्यामागे के कारण असतील .
तर गुड्डन भय्या पुढे बोलू लागले जर विचार केला तर जुन्या काळात सासू सुनेच नात हे ज्याप्रमाने वर्णन केले जाते त्या हिशेबाने सुनेला विश्रांतीच्या काही दिवसामध्ये दिवाळी हा सन असावा . कारण काही का असेना आई आणि मुलीत नाते जे होते ते घट्ट असते असा समज होता .
आपल्या मराठवाडा प्रांतात आणि इतर जागी दिवाळी अशी वेगळी का दिसते .एक फरक असा होता की नगर नाशिक पुणे या ठिकाणी दिवाळीला सून लक्ष्मीपूजनाला स्वतःच्या घरी असते आणि भाऊबीजेला माहेरी जाते पण आपल्याकडे अगोदरच आणि फार जास्त कालावधी असतो .त्यावर गुड्डन भय्या बोलले मला जसे कळते (आता हे गुड्डन मुंबई , पुण्यात राहून आल्यान अनुभवी वाक्य होते ). आपल्या आणि तिकडे एवढंच फरक आहे की गावातून एखादा माणूस मुलीच्या दुसऱ्या गावी जात आहे तर तिकडे तासात आणि किलोमीटर मध्ये मोजतात आपल्याकडे तीन जागी मुक्काम असतो नाहीतर एक दिवस पूर्ण जातो .
आणि आजही तुम्हाला पुण्या मुंबईत राहणारे आपले लोक परत येतांना दिसत नाहीत कारण तिकडे प्रवास हा नियमित आहे .तुम्ही खूप विचार केला तरी आपण रोज थोडीच 50-100 किमी फिरतो . तिकडे रोज फिरतात . आणि सन वाराच्या काळात बरोबर तुमची लूट केली जाते वेगवेगळ्या माध्यमातून ( एसटी संप , खाजगी गाडी दुप्पट किंवा तिप्पट भाव घेते ) .
एवढे बोलणे झाले की आम्ही आपापल्या कामाकडे लक्ष देण्यात गुंतलो . पण मनात ती गोष्ट अजूनही होती म्हणून आज ही लिखानात आली
Comments
Post a Comment