गुळवे पाटील लातूर वाले
प्रवास : चाकण ते पिंपरी.
प्रवासानंतर ज्या ठिकाणी पोचायचे तिथे सहज म्हणून जायचे निघलो तर संध्याकाळ झाली. फोन करून गेलो म्हणून घर सापडायला कमी वेळ लागला . तशी अपेक्षा नव्हती पण जवळपास 8-9 वर्षानंतर एक चेहरा डोळ्यासमोर आला जो ओळखीचा तर होता पण पाहण्यात नव्हता .
बघितल्यावर नेहमी प्रमाणे नमस्कार झालं . पण त्या हर्शमय वातावरणात थोड्या वाईट बातम्या थोड्याच वेळच्या संभाषणात जगजाहीर झाल्या.
साहेब आताच गावाकडून तिथे आले होते . वडिलांना बऱ्याच वेळा दवाखाना झाला असे कळले आणि थोडा वेळ मी ही संभाषण थांबवले .
पुढे नेहमीप्रमाने आपल्या शैलीत साहेब बोलले "किती गोष्टी सांगितल्या त्या खऱ्या झाल्या . "
आपलंही समर्थनार्थ उत्तर "जवळपास सगळ्याच ."
मग उगाच कर्णाच उदाहरण दिल्यावर तिकडन उपरोधक बोलणे "कर्ण कुठ आपण कुठ आपल्या सोयीनुसार कोणाशी तुलना करने अजून संपले नाही का तुझ ."
नाही आपले उत्तर . यापेक्षा ज्या गोष्टींनी आपले अर्थर्जन होईल त्याच गोष्टी येऊ द्या बाहेर .
बाकी ज्याला भेटायला गेलो तो मुलगा बाहेर नातेवाईकांना भेटायला जात होता . त्याला वाट लावून आपले संभाषण परत चालू झाले ते जेवण करण्याअगोदर.
नेहमीचे विषय चघळयला आहेत पण नवीन विषय तो आरक्षणाचा . दोन मुद्दे जे साहेबांनी योग्य प्रकारे मांडले .
जवळपास दसऱ्याच्या आसपास भेटलो म्हणून दसरा मेळावा आमच्या विषयात आला. आता हे मराठे आपल्या नेत्यांचा दसरा मेळावा करायला जाणार . ते जरांगे पाटील तिकडे जिवाचं रान करता आहेत पण कोटी मराठे पुन्हा सत्रंज्याच उचलणार .
बदल हा हळू हळू होत असतो , आपले उत्तर.
दुसरा मुद्दा शांततेत किती वेळ घालवला आहे किती मोर्चे झाले काही उपयोग नाही , राजकीय लोकांची मानसिकता नाही आरक्षण देण्याची .
हा हे बरोबर आहे पण किती वेळ , लोक काही तरी करत राहतात पण यावेळी शेवटचं आंदोलन हा माणूस गेला की संपले मग , आपले उत्तर.
मग जुने काही वाक्य त्यांनी परत रिपीट केले "काय माणसे असतील ते तुकाराम महाराज, नानक देव, नामदेव महाराज त्यांनी सोशल मीडिया नसतांना त्यांना एवढे अनुयायी भेटले ."
आता असा एक माणूस आपल्याला डोळ्यासमोर तर दिसतोय पण किती दिवस राहील काय माहित .
"आता लोक तितकेच लवकर विसरून जातात आणि घर के भेदी भरपूर भेटतात राजीव दीक्षित माहीत आहे ना " आमचे वाक्य.
बाकी नंतर वैयक्तिक काही गोष्टी शेअर केल्यानंतर , मी विचारले कोण कोण आहे संपर्कात , सध्या तरी इथे जेवढे आहेत तेव्हढेच हे उत्तर.
मग मी बाकी मित्रांना कॉल सुरू केले . ओळखीतील सर्वांनी ते उचलले आणि मी त्यांना तोच प्रश्न विचारला कोण कोण आहे संपर्कात सर्वांनी आपापल्या सोयीनुसार उत्तर दिले. आणि काही ठिकाणी आम्ही दोघांनी मिळून दुसऱ्यांची मजा घेतली .
त्यातल्या एकाला आम्ही शनिवारी भेटायला बोलावले . मही नाही आता तो शनिवार कधी येतो.
पण अशा व्यक्ती आयुष्यात असल्या की काही तरी करत राहावे लागेल तर आपण जगतोय आणि ते जगणे सार्थक होईल असे वाटते.
Comments
Post a Comment