मास्तर भाऊ

ही गोष्ट आहे 2007-08 च्या काळातील आहे . काही माणसे मला त्यांच्या जाण्याच्या समयी माझ्या घरी भेटून गेले त्यातलेच माझे चुलते मास्तर भाऊ. मी तेव्हा  8 वीत असेल आणि मी माझे गणिताचं पुस्तक वाचत होतो आणि माझ्या कडे 9 अंकी संख्या पर्यंत पुस्तकात वाचत असताना आणि तेव्हा तिथं तेही उपस्थित असल्याने त्यांनी सहज मला विचारले की ह्याच्या पुढं काय असते माहीत आहे का. मी म्हणालो नाही, त्यांनी पुढे सांगितले की रामायणात 18 महापद्म वानर होते श्रीरामासोबत . 
मग कोटी , दशकोटी , अर्व, खर्व , निखर्व, पद्म,  महापद्म  येथपर्यंत गणती मांडून दाखवली आणि मी ही ते काही वेळातच आत्मसात केली .
 ते सर्व पाहून त्यांनी मला ज्ञानेश्वर महाराजांचे पसायदान समजून सांगितले की कृष्ण आणि ज्ञानेश्वर यांत फरक एवढा आहे की कृष्ण अर्जुनाला लढायला सांगतो आणि ज्ञानेश्वर आचरण शुद्ध ठेवयाला सांगतात जेणेकरून पुढील व्यक्तीचे मतपरिवर्तन होण्याची शक्यता असते कारण 
सत्ययुग - साम.
त्रेतायुग - दंड (बळ)
द्वापार - दाम
कली - भेद (बुद्धिभेद)
म्हणून द्वापार कालीन आणि कलियुगीन मानवी अवस्था आणि अपेक्षा ह्या खऱ्याने वेगळ्या आहेत.
ह्या प्रसंगाचा माझ्या जीवनात फार मोठा परिणाम झाला आणि मी आपल्या रुजलेल्या संस्कृतीबद्दल कुतूहल बाळगायला लागलो .
जसे अर्धा क्षण संत संगती माणसाला सायुज्यता मोक्ष प्राप्ती होते म्हणतात अगदी तसेच काही मला त्या प्रसंगी मला अनुभवायला आले.


Comments

Popular posts from this blog

म्हस्के पाटिल बिजनेस anyalist

डॉ. ननावरे , PHD Marathi, LLM, PHD scolar in law.

अल्ताफ आणि ताबिष