राम मंदिर आणि शंकराचार्य
Travel: - from Pune to Bangalore in flight& bus.
Mate persons: - various.
(सिद्धम , पाटील १ , सोळंकी artfab , पाटिल २)
काही मोजक्याच प्रवासमधील हा एक प्रवास . विंडो सीट आणि बसण्याच्या जागेवर तडजोड ही कोणत्याही आणि कितीही महाग प्रवास असुद्या टी गोष्ट शाश्वत असते ही मी त्या दिवशी अनुभवले पुढे 90-100 मिनिटांचा हवेतला प्रवास आरंभ झाला आणि मी इतर आजूबाजूच्या व्यक्तींना बोलणे चालू केले ते एक्सपो चे दिवस होते म्हणून जवळ पास सर्वच लोक एक्सपो लाच चाललेले होते असे मला कळले .
मग मी ही आपण तेथे कामाला असून अश्या रबर च्या कारखान्यात कामलाच चालल्याचे नमूद केले तर मला माझ्या बाजूचे लोक हेही त्या क्षेत्रात काम करत असल्याचे कळले पुढे मी अजून विचारपुस करत आणि अनेक विषयावर बोलणे चालू झाले मग विषय निघाला राम मंदिर आणि शंकराचार्य हा कारण जवळपास त्याच कालावधीत आम्ही हा प्रवास करत असू .
तर मोदी आणि शंकराचार्य ह्यामध्ये मोदी त्यांना पाहिजे असलेल्या यजमानपदासाठी असलेल्या सर्व विधी आणि आचरणाचे पालन करत आहेत तर हा राजकीय कार्यक्रम आहेत म्हणून शंकराचार्य तिथे गेले नाहीत हेही मला परत इतरांकडून स्पष्ट झाले . मग हा राजसत्ता आणि धर्मसत्ता हा वाद आहे का असे मी विचारले तर असलेही पण आपल्याला त्याचा फारसा फरक नाही असे पुढून आले . तर राम मंदिर म्हणजे बाबरी आलीच आणि मग आले सर्व मंदीर मशिद विवाद तर आनंद रंगनाथन यांची सर्व मंदिर मुक्त करण्याची मागणी तर 3 मंदिरे घ्या आणि बाकी सेट्टलमेंट करा असे म्हणणारे संघ परिवार असे मी मांडले तर जनता आता फक्त मंदिर बघणार की इतर गोष्टी कडे लक्ष देणार मग साहजिकच मुद्दा आला तो म्हणजे पायाभूत सुविधा आणि राजकारण याचा मग पुणे आणि बंगळूर सारखी शहरे आपल्या प्रांतात का नाहीत आणि ह्या शहरातच गर्दी वाढत राहिली तर ते फुटतील की काय अशी परीस्थिति झाली आहे आणि आम्हाला आमचे तिकडे काही तरी द्या म्हणजे आम्ही गर्दी करू अशे आपले नेहमीचे ठरलेले मुद्दे मी समोर ठेवले तर आपल्याकडे नैसर्गिक स्त्रोत ,पानी , वीज , आणि शेवटी लोकप्रतिनिधीची कमालीची उदासीनता ही मुद्दे पुढून आले मग वैयक्तिक पातळीवर मुद्दा जेव्हा जातो तेव्हा साहजिकच बीड आणि बीडचे आमदार खासदार आणि इतरही (मुंडे,देशमुख,महाजन) ही मंडळी काही वाईट गोष्टीसाठीही प्रसिद्ध असल्याचे मी सांगितले तर मुद्दा पुढे जाऊन आरक्षण आणि बीड च्या मुळ मेटे यांचेही नाव त्याच गटात झाले . आणि मग मी विचारले . मंदिर बघायचे आहे तर लेपाक्षि मंदिराला आमच्या सोबत असलेले सिद्धम चालले होते मग मी सहज विचारले राम मंदिर तर झाले पण एक प्रश्न पडतो की जर पेशवे ,मराठे दिल्ली वर ही राज्य करत होते तर ज्ञानवपी त्यांनी का नाही बदलली म्हणजे ते परिपूर्ण नव्हते किंवा त्यांना या गोष्टी कराव्या वाटल्या नाही का असे मी विचारले असो तेथपर्यंत आमचे 90 मिनिटे संपले होते आणि उतरायची वेळ झाली होती म्हनुन तो विषय तिथेच अवरला (नंतर आज काल मध्ये मला कळले की सर्व मराठ्यांनी तेथील तत्कालीन भट लोकांना विचारले पण मोहल्ला अससी फिल्म सारखेच सर्व जागी देव आहे असे म्हणा किंवा शाश्वती नाही म्हणा किंवा उदासीनता म्हणा पेशवे , शिंदे आणि शेवटी अहिल्याबाई पर्यन्त ही गोष्ट भिजत घोंगडे राहिली आणि अहिल्याबाई यांनी ते मंदिर पूर्ण केले )
पुढे बस मध्ये बसलो तर महाराष्ट्रियन नाशिककर आणि खराडीतील लोक भेटल्याने मी जरा चकित आणि सुखी झालो
तर त्यांच्याशी बोलतांना तेही एक्सपो साठी आले होते आणि मग आम्ही नेहमी प्रमाणे संभाषण चालू केले
तर बंगळूर आणि पुणे यातील बस सेवा तसेच इतर वाहतुक व सेवा ह्या विषयी तुलना चालू झाली बंगळूर ला मेट्रो चालू आणि तेथे गर्दी मुंबई लोकल सारखी नसल्याने मेट्रो प्रवास हा बंगळूरचा स्ट्रॉंग पॉइंट , आणि बस प्रवास दोन्ही शहरात सारखाच असल्याचे आमचे एकमत झाले तर दोन्ही शहरे जवळपास गर्दी सारखी आहे पण पुण्यात डोंगर आणि पानी दोन्ही आहे आणि बंगळूर ल पाण्याचा जर विषय नाही मिटला तर बंगळूर रिकाम व्हायला वेळ लागणार नाही ही गोष्ट आम्ही मराठीत बोलत होतो आणि ऐकणारे कोणी नव्हते ही मला बरे वाटले कारण आपण कुठे जर पाहुणे म्हणून गेलो तरी यांचा गाव किती चांगला हे प्रत्येक जन सांगत असतोच . पन भाषा वाद तेथे चालू झाला होता आणि amul आणि नंदिनी ही त्याचेच एक उदाहरण होते हे ही मी सांगितले मग मुद्दा कायदा सुव्यवस्थेवर गेला आणि मग मी बोललो आपण नाशिक कर आहात असा प्रसंग तुम्हाला अनुभवला आला असेलच असे नाही पण जर एखादा राजस्थानशी सौख्य असलेला आयपीएस अधिकारी किंवा उप ,बिहार , कहा अधिकारी तुमचे स्थानिक प्रश्न सोडवताना काय काय काळजी घेईल (जर एखादा मारवाडी, किंवा वंजारी जो आम्ही राजस्थानवरून आलोत ही अभिमानाने सांगत असेल आणि तो एक प्रशासकीय पद भूषवत असेल त्याला येथील लोक आणि येथील मुद्दे याविषयी किती आस्था असेल हा प्रश्न पडतो )
मग याही ठिकाणी मी प्रयत्न केला की तो राम मंदिर आणि शंकराचार्य हा मुद्दा सांभाषणात येईल आणि इथे मला काळले की मोदीजी कालाराम मंदिरात गेले होते आणि तेथे एक विधी किंवा आचरणाचा भाग म्हणून एके दिवशी झाडून काढायचे होते ते त्यांनी केले . मग शंकराचार्य अश्या माणसाच्या का विरोधात आहेत असा प्रश्न आला तर धर्म आणि राज सत्ता यांचा रास्ता वेग वेगळाच असतो अशे आम्ही सारांशीत करू लागलो तर मी परत विचारले की मग मोदींनी काय अॅक्शन घ्यावी यांच्याविरोधात तर काही विशेष उत्तर नाही मिळाले पान मग मी आपसूक बोलून गेलो की मोदींनी गुरुकुल उभारावेत आणि तिथे सर्व लोकांना वेदांचे ज्ञान एक विशेष समुदायाची मक्तेदारी न राहता सर्वांना ते ज्ञान मुक्त करावे.
(काही दशकांपूर्वी महाराष्ट्रात अशीच गोष्ट एक माणसाने केली होती ते म्हणजे राजर्षि छत्रपती शाहू. जे काही संस्कृत तज्ञ आज असतील तेही ही मान्य करतील की छत्रपती शाहू , श्रीकांत जीचकर आशा काही असमान्य बुद्धितमत्ता असलेल्या माणसांमुळेच संस्कृत चे महराष्ट्रात जे काही कार्य झाले असेल ते आहे.)
माझा स्टॉप आला आणि मी उतरलो .
Comments
Post a Comment