दास बाबू बंगाली आणि केके सेलुकर

प्रसंग - b. Tech. शेवटचे सत्र जेथे internship करायची होती .
सातारा गावाजवळ जेव्हा मी माझ्या उरलेल्या शेवटच्या सत्रात खंडोबा मंदिराच्या 2 किलोमीटर च्या जागेत मित्र केके च्या खोली मध्ये राहायला गेलो . तेव्हा नुकतेच काही लोक त्याला भेटुन निघत होते आणि त्यांचा संभशनातला विषय होता अग्निहोत्र त्यांची अशी मान्यता होती की ओझोन वायू त्या अग्निहोत्र केल्याने संकलित होतो मी त्यात नुकताच सहभाग घेऊन आपले विचार व्यक्त करावे असे मला वाटले नाही, म्हणुन मी काही बोललो.
पुढे जेव्हा मी स्थिरस्थावर झालो त्यावेळी मला केकेने एक b. Arch. Koushik Das यांची भेट घालून दिली .
तो काळ नुकताच कट्यार काळजात घुसली हे नाटक चित्रपट रुपात पूनहप्रदर्शित झालेले होते आणि आम्ही जवळपास दोन - तीन वेळा ती फिल्म बघितली .
मग दास बाबू मला विचारायला लागले वो "संभाजी 1689  फिल्म रिलिज होगयी क्या ".
मी म्हणालो नाही , तर ते म्हणाले की कूछ सच्चाई जलदी से जलदी लोगो मे publish होनी चाहिए.
मी म्हणलो होगी तब देखेंगे.
मग माझ्याकडे जे 3 ते 3.5 GB Rajiv Dixit यांचे व्हिडिओ होते ते मी एक दिवस बघत होतो तेव्हा ते काही कामासाठी आलेले असताना त्यांनी ते बघितले आणि कब से ये देख रहे हो असे विचारले मी म्हणालो डिप्लोमा से देख रहा हुं. अच्छा आदमी दिखता है कहा मिलेगा (जणू काही ते जाऊन भेट घेणार )मग आम्ही शोधले तेव्हा कळलं की 2010 त्यांचा मृत्यू झाला आहे .
पुढे केके आणि आम्ही एका रविवारी परत जेव्हा ते मित्र जे अग्निहोत्र करायचे ते आले त्या दिवशी त्यांची भेट झाली . आणि तेथे मला जवळपास काही नवीन गोष्टी कानावर आल्या ज्या मी अगोदर नव्हत्या ऐकल्या .
त्यात आर्य सनातन वैदिक हिंदू हे चार शब्द एकत्र करून संघ चालतो .सर्व विश्वात संघ पसरलेला आहे . गोरक्षा - गायीचे भूमीवरील महत्त्व इत्यादी.
मग जेव्हा ते गेले आम्ही तिघे मी , के के , आणि दास जवळच असलेल्या खंडोबा मंदिराला दर्शन घेऊन आलो . गर्दी फार नव्हती पण मंदिराचे 2 थर दिसून येत होते एक भाग जुना दगडगोट्यांचा तर नवीन भाग सिमेंट काँक्रिट चा मग साहजिकच कळून आल्याने मी चालू झालो " ये मंदिर को किसने यहा आके तोडा होगा " तर पुन्हा त्याच गोष्टी ज्या आपण ऐकतो आक्रमण कर्ते मुघल आणि शिवाजी महाराज यांच्या काही गोष्टी आम्ही पुन्हा वर्णन केल्या .
पुढे एका दिवशी काबा आणि इतर मंदिर यांच्याबद्दल जेव्हा संभाषण चालू होते . तर ओक यांच्या नुसार काबा या भूमी मध्ये जेव्हा गंगेचे पाणी पोचेल तेव्हा इस्लाम धरमाचा नाश होईल , काही मंदिर हटवल्याने तिथे पुरप्रसंग आले अशा गोष्टी माझ्या समोर मांडल्या गेल्या .
आणि मग मी सहज विचारले इस्कॉन मंदिराबद्दल तेव्हा ते कसे अमेरिकन आहे आणि आपला पैसा कसा खर्च होतो हे मला कळलं पण मग मी विचारले की  मग आपला उद्देश आहे काय ??  जगातील सर्व उपासना पद्धती एकत्र करून एकच धर्म बनवणं का आपली उपासना पद्धती जपणे तर आपली उपासना पद्धती जपणे हिच प्रथम निती आहे असे स्पष्ट झाले . 
बरं इस्कॉन बद्दल मला दास बाबू बंगाली असल्याने त्यांनी सांगितले की जेव्हा वैष्णव शैव , शक्त असा भूभाग वाटलेला आहे आणि बंगालच्या देवी नवरात्री आणि गणेश यांचे उत्सव प्राणप्रतिष्ठा आणि विसर्जन हा 
जादू सारखा एक भाग आहे आणि भीमाची सासरवाडी मयोंग बद्दल काही गोष्टी सांगितल्या .
पुढे एक प्रसंग असाही होता की मी यजुर्वेद  आणि यज्ञाचे आयोजन त्याचा वापर हा मांसाहार करण्यासाठी होतो असे विचारले असता मी होकार दिला तेव्हा थोडे वैचारिक मतभेद झाले पण आज जेव्हा मागे वळून बघतो तर .
मी जे इतिहास आणि संस्कृती यांच्याशी सबंध ठेवतो त्यावरून आणि इतर काही प्रसंगातून एवढे सांगू शकतो .
33 कोटि देवता हे त्या काळातील शासन आणि प्रशासन होते तसेच जसे आपण भूमिपूजन लोकार्पण किंवा इतर ठिकाणी समारंभ ठेवतो ते यज्ञ आणि त्याचे कारण स्पष्ट असायचे जसे राजसूय म्हणजे राज्याची इच्छा .हा यज्ञ कधी खाजगी असतो तर कधी सार्वजनिक .
आणि मला जेवढे इंटरनेट वरून कळले आहे शेवटचे 2 यज्ञ जे पृथ्विव्यापी होते ते अर्जुन सुभद्रा यांचा वंशज जनमेजय याने केले एक सरपांच्या नाशासाठी आणि एक अश्वमेध जो कलियुगी शेवटचा अश्वमेध होता कारण कल्युगी अश्वमेध फलकारक नाही . कारण तसा उद्देश आज ठेवता येत नाही आपण राज्याचे , राष्ट्राचे स्वरूप सिमांनी बांधले आहे ते नष्ट होईल जर असा प्रयत्न जरी कोणी केला तर.
कधी भविष्यात परत भेट झाली तर नक्की या गोष्टींची उजळणी होईल .

Comments

Popular posts from this blog

म्हस्के पाटिल बिजनेस anyalist

डॉ. ननावरे , PHD Marathi, LLM, PHD scolar in law.

अल्ताफ आणि ताबिष