कौठाळे सर

बहुतेक आमची शेवटची बैठक जी जेवताना रंगली .
नेहमीचे सर्व मंडळी टेबलवर होते .
त्या वातावरणात मी नेहमी प्रत्येक गोष्टीत नैसर्गिक स्वभावानुसार काहीतरी निगेटिव्ह शोधतो हा विषय चालला होता .
तर मुद्दा जेव्हा डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या गोष्टीचा होता त्यांनी मला जेवढे वेळा पाहिले त्यावरून माझ्या जीवनात डावीकडून उजवीकडे गेलेला शिवम मो बघितला हा बदल का झाला असे त्यावेळी आपसूक माझ्या तोंडातून जे मी बोललो ते मला आजही लक्षात आहे  
"देशमुख आणि पाटील बदलले तरी शेतकऱ्यांच्या कुळाला फारसा फरक पडला नाही आणि पडणार नाही, आज जी परिस्थिती भारतात आहे त्यासाठी हे वाक्य पुरेसे आहे की नेपोलियनच्या पराभवानंतर फ्रान्स मध्ये पुन्हा हुकूमशाही आली आणि नेपोलियन जेरबंद झाला पण लोकांना नेपोलियन नंतरचा इतिहास नाही सांगितलं जात".
यावर कौठाळे सर बोलले "नक्कीच ती हुकूमशाही आरएसएसएस ची असेल आणि समोर बसलेल्या त्यांच्या साथीदाराने मग ती योग्यच असेल असे जोडले "
यावरून तुम्हाला असे वाटत असेल की कौठाळे सर नक्कीच हिंदुत्ववादी असतील पण नाही ते स्वतः ला अँटी establishment म्हणतात मग ते नक्कीच घराणेशाहीला विरोध करत असावेत नाही का.
खात्रीने नाही सांगता येणार,
 पण मी माझ्या जीवनात प्रश्न विचारने सोडले नाही आणि समोरील व्यक्ती मला शंकानिरसन करणाऱ्या मिळाल्या हेच काय ते सुख .
मी सहज एक कुतूहल म्हणून प्रश्न केला असेल की या कंपनीत कोणी phd आहे का ? तर ते बोलले की अजून तरी कोणी दिसत नाही पण मी करेल कधीतरी मी विचारले की आता mba नंतर आणि या क्षेत्रात कोणती phd सर तर organizational behaviour असे उत्तर मला मिळाले होते जे की माझ्यासाठी मला शांत करणारे होते कारण मी आत्ताच ते शिकत होतो.

इतर अनेक गोष्टी ज्या कानावर येतात त्या नक्कीच मनावर घ्याव्यात का आणि कशासाठी आपण काम करतोय ते पहिल्यांदा समजून घ्यावे मग काम करावं असे मी बघून शिकलो .

बाकी इतर भरपूर व्यक्ती आहेत पण वेळ आणि काळ ठरवेल त्या छापून कधी येतील .

Comments

Popular posts from this blog

म्हस्के पाटिल बिजनेस anyalist

डॉ. ननावरे , PHD Marathi, LLM, PHD scolar in law.

अल्ताफ आणि ताबिष